१९८४ शीख दंगली रोखता आल्या असत्या – मनमोहन सिंग

19

नवी दिल्ली: १९८४ च्या शीख दंगलीचा कॉंग्रेसवर सातत्याने आरोप होत आहे. आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. मनमोहन सिंग म्हणाले आहेत की तत्कालीन गृहमंत्री नरसिंह राव यांनी इंद्रकुमार गुजराल यांचा सल्ला स्वीकारला असता तर इतकी मोठी दंगल घडली नसती.
इंद्रकुमार गुजराल यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाला संबोधित करताना मनमोहन सिंग म्हणाले, “गुजराल यांनी नरसिंह राव यांना लवकरात लवकर सैन्य बोलावण्याचा सल्ला दिला. त्यावेळी इंद्रकुमार गुजराल या पदावर नव्हते, परंतु त्यांनी नरसिंह राव यांना ज्येष्ठ राजकारणी म्हणून सल्ला दिला होता. ”
ऑपरेशन ब्लू स्टारनंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केली होती. इंदिरा गांधींचे दोन्ही अंगरक्षक शीख होते. यानंतर दिल्लीसह अनेक भागात शीखविरोधी दंगल उसळली. सर्वात भयंकर दंगल दिल्लीमध्ये घडली आणि त्यात सुमारे तीन हजार लोक मारले गेले. १९८४ च्या दंगली प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने २०१८ मध्ये मुख्य आरोपी सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.