नवी दिल्ली, ३० जानेवारी २०२३ भारताचा माजी सलामीवीर फलंदाज मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोमवारी त्याने ट्विटरवर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली आहे. यापुढे आता मी परदेशी लीगमध्ये नशीब आजमावणार असल्याचे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
विजयने भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये खेळला होता. मुरली विजयने आतापर्यंत ६१ कसोटी सामने खेळले असून त्याने ३,९८२ धावा केल्या आहेत. तर १७ एकदिवसीय सामन्यात ३३९, तर कसोटी सामन्यात बारा शतके आहेत. तर नऊ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून १६९ धावा केल्या आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.