नवी दिल्ली: कर्नाटकमधील १५विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीसाठी मतदानाला आज (दि.५) सकाळी ७ वाजता सुरुवात झाली आहे.
या पोटनिवडणुकीमुळे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे भवितव्य निश्चित होणार आहे.
भाजपला राज्यात सत्तेत राहण्यासाठी पोटनिवडणूक होत असलेल्या एकूण १५ जागांपैकी ६ जागा जिंकणे आवश्यक आहे.
या पोटनिवडणुका १७ आमदारांना अपात्र ठरवल्याने रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी घेण्यात येत आहे. या पोटनिवडणुकीचा निकाल ९डिसेंबरला लागणार आहे.