नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी २०२३ :भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकर प्रतिबंधित पदार्थ सेवन केल्यामुळे चर्चेत आली आहे. इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सीने (ITA) दीपावर बंदी घातली आहे. भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरवर आयटीएने हायजेनामाइन प्रतिबंधित पदार्थाची चाचणी ( डोप टेस्ट) पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला अपात्र ठरवत २१ महिन्यांची बंदी घातली आहे. ही बंदी १० जुलै २०२३ पर्यंत लागू राहणार आहे.
ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी दीपा ही पहिली जिम्नॅस्ट होती. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दीपाने चौथे स्थान पटकावले होते. याआधी कर्माकरने २०१४ च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारी दीपा पहिली महिला जिम्नॅस्ट होती.
त्यानंतर आता आयटीएने दीपा कर्माकरला २१ महिन्यांच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे. FIG अँटी-डोपिंग नियमांच्या कलम १०.८.२ नुसार असलेल्या कराराद्वारे या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.
- दीपाच्या चाचणीत कोणते औषध सापडले?
दीपा कर्माकर हिजेमिन एस-३ बीटा-२ घेतल्याबद्दल दोषी आढळली आहे. इंटरनॅशनल डोपिंग एजन्सीने Hygemin S-३ Beta-२ ला प्रतिबंधित औषधांच्या श्रेणीत ठेवले आहे. या औषधांचे सेवन केल्याबद्दल दोषी आढळलेल्या कोणत्याही खेळाडूवर बंदी घातली जाऊ शकते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.