वाहन चालविताना कळत-नकळत चुका होऊन ऑनलाइन दंड झाल्यास ई-चालान भरा अन् चिंतामुक्त ड्रायव्हिंग करा!

निगडी, ता. ५ फेब्रुवारी २०२३ : वाहन चालविताना तुमच्याकडून कळत-नकळत चुका झाल्या तर तुम्हाला आरटीओ कार्यालयाकडून ऑनलाइन चालान पाठविले जाते; मात्र अनेकांना ऑनलाइन दंड कसा भरावा, हेच माहीत नसते किंवा अनेकजण माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष करतात; परंतु ऑनलाइन चालानकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कारण पुढच्या वेळी देशभरात कुठेही पोलिस किंवा आरटीओने पकडले तर पूर्वीचा दंड आणि नवीन दंड भरताना तुमचा खिसा खाली होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर दंड भरून चिंतामुक्त होण्याची गरज आहे.

दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालविताना सिग्नल तोडला जाणे, हेल्मेट न वापरणे, नो-पार्किंगमध्ये वाहन पार्किंग करणे आदी अनेक कारणांमुळे पोलिस किंवा आरटीओकडून दंड लावला जातो. ही दंडाची प्रक्रिया आता ऑनलाइन झाल्याने तुम्हाला लागलेला दंड (Fine) तुमच्या वाहनाच्या नंबरला जोडला जातो आणि त्याचा एक मेसेज तुमच्या फोनवर पाठविला जातो. तेव्हा चूक झाली किंवा चूक नसतानाही दंड लावल्याचे लक्षात येते.

वेबसाईटला द्या भेट
mahatrafficechallan.gov.in या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला स्क्रीनवर E-Challan Payment Maharashtra State दिसेल. या स्क्रीनवर सर्वांत पहिल्यांदा तुम्हाला व्हेईकल नंबर आणि चालान नंबर हे दोन ऑप्शन दिसतात. त्यात आपण व्हेईकल नंबर हा ऑप्शन निवडायचा आहे. हा ऑप्शन निवडल्यावर वाहनाचा नंबर टाकून झाल्यावर तुम्हाला चेसीस नंबरचे शेवटचे चार आकडे इथे टाईप करावयाचे आहेत; तसेच दुसरा कॉलम व्ह्यूचा असतो. त्याखाली डोळ्याचे चिन्ह असते, त्या चिन्हावर क्लिक करून तुम्ही त्या चालानची सविस्तर माहिती बघू शकता. त्यात चालान नंबर, चालानची तारीख, ड्रायव्हिंग लायसन्स नंबर, वाहनाचा नंबर, पेमेंट स्टेट्स, चालान पैसे, चालानची जागा, पुरावे, चालानची कारणे दिसतात.

असा भरा दंड
वेबसाइट पेज ओपन केल्यावर केल्यानंतर फाइनवर टीकमार्क करून त्यावर असलेले सिलेक्ट ई-चालान ॲंड
क्लिक हेअर टू पे (Select echallans & Click here to Pay) हे बटन क्लिक करावे लागते. त्यानंतर पेमेंटच्या टर्म अँड कंडिशन सिक्युरिटी पॉलिसी (Terms and Conditions Security Policy) वाचून नंतर ॲग्री (Agree) ऑप्शनवर टीकमार्क करायची आहे. नंतर येणाऱ्या उजव्या बाजूला Pay Now च्या बटनवर त्यानंतर तुम्हाला Pay Through Bill Desk या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. पुढे पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा क्यूआर कोड (QR Code) या ऑप्शनद्वारे पेमेंट करता येते.

तक्रारही करता येते
वेबसाईटवरील माहितीमध्ये पुरावे (Evidences) भागात क्लिक केल्यावर तुमच्या वाहनाचा चालान पाडण्यावेळचा फोटो जोडलेला असतो. जर हा फोटो तुमच्या नसेल तर तुम्ही तक्रार करू शकतात. या तक्रारीसाठी Grievance चा ऑप्शन असेल तिथे आपण तक्रार दाखल करू शकतात.

पावतीही मिळते लगेच
पेमेंट पूर्ण झाल्यावर पेमेंट सक्सेसफुलची स्क्रीन दिसेल. त्यवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटची पावती दिसेल. नंतर ती पावतीही डाऊनलोड करता येते. त्यानंतर तुम्ही परत वेबसाइटवर जाऊन वाहनाचा क्रमांक आणि चालान क्रमांक टाकून स्टेट्स पाहू शकतात. याशिवाय रस्त्यावर उभ्या असलेल्या कुठल्याही ट्रॅफिक पोलिसांकडे जाऊन त्यांच्याकडे असलेल्या ई-चालन मशीनद्वारेही दंड भरू शकतात.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा