ओम अन् अल्लाह एकच…; जमियत उलेमा-ए-हिंदच्या मंचावर मौलानांचे वक्तव्य

नवी दिल्ली, १२ फेब्रुवारी २०२३ : जमीयत उलेमा-ए-हिंद चे शेवटचे मौलाना अरशद मदनी यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. जमीयत उलेमा-ए-हिंद यांच्या ३४ व्या अधिवेशनात मौलाना अरसद मदनी यांनी आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी अल्लाह आणि ओम एकच असल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात अधिवेशनात उपस्थित वेगवेगळ्या धर्माचे धर्मगुरू उठून गेल्याचे देखील पाहायला मिळाले.

अधिवेशनात मौलाना मदनी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिमांबाबत केलेले वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे. अल्लाह आणि ओम एक आहेत. ते म्हणाले की, ‘आम्ही या देशात प्रथम जन्मलो, म्हणून घरी परतलो आणि सर्व मुस्लिम हिंदू आहेत’ हे भागवतांचे विधान निरक्षर आहे. मदनी यांच्या या वक्तव्यानंतर मंचावर उपस्थित जैन साधू गुरु लोकेश यांनी उभे राहून आपला निषेध व्यक्त केला.

तसेच सर्व धर्मातील लोकांना जोडण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, मग त्यात असे आक्षेपार्ह विधान का ? मदनी यांच्या वक्तव्यानंतर जैन गुरू लोकेश मुनी म्हणाले, ‘तुम्ही जे बोललात त्याच्याशी मी सहमत नाही. तसेच येथे उपस्थित असलेले सर्व संतही याच्याशी सहमत नाहीत. ओम, अल्लाह, मनू, त्याच्या मुलांची ही कहाणी… हे सर्व मूर्खपणाचे आहे. तुम्ही एकजुटीच्या शक्यतेचे संपूर्ण अधिवेशनच उधळले आहे.’ यानंतर ते इतर धर्मगुरूंसह मंचावरून निघून गेले.

  • काय म्हणाले मदनी?

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मौलाना मदनी म्हणाले, ‘कोणी नसताना मी विचारले. ना श्रीराम, ना ब्रह्मा, ना शिव; कोणी नसताना मनुने कोणाची पूजा केली ? काहीजण म्हणतात की ते शिवाची पूजा करत असत. फार कमी लोक सांगतात की मनू ओमची पूजा करत असे. ओम कोण आहे ? अनेकांनी सांगितले की त्याला कोणतेही रूप किंवा रंग नाही. ते जगात सर्वत्र आहेत. अरे बाबा, याला आपण अल्लाह म्हणतो. तुम्ही त्याला देव म्हणता.

न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा