नवी दिल्ली, १४ फेब्रुवारी २०२३ :बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर आयकर विभगाचे छापे टाकले आहेत. या धाडी दरम्यान आधिकऱ्यानी कर्मचाऱ्यांचे फोन ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. बीबीसीच्या लंडन हेडक्वार्टरला देखील छापेमारी बाबत माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली कार्यालयानंतर मुंबईत देखील आयकर विभागाने छापे टाकले आहेत. ६० – ७० लोकांची आयकर विभागाची टीम कार्यालयात पोहोचली आणि त्यांनी तपास सुरु केला. तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे फोन देखील जप्त करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडून घरी जाण्यास सांगितले आहे.
बीबीसीवरील आयकर विभागाच्या धाडीबाबत काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने अधिकृत ट्विटर हँडलवरुन म्हटले की, आधी बीबीसी डॉक्युमेन्ट्री आली, त्यावर बंदी घालण्यात आली. आता आयकर विभागाने बीबीसीवर छापा टाकला आहे. ही अघोषित आणीबाणी असल्याचे म्हटले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.