इस्लामाबाद,१६ फेब्रुवारी २०२३ : पाकिस्तानात सध्या महागाईनं उच्चांक गाठला असून, पुन्हा एकदा पेट्रोल बॉम्बचा स्फोट झाला आहे. त्यानुसार पाकिस्तानातील इंधनाचे दर आज १२ टक्क्यांनी वाढले आहेत.
- पेट्रोल २७२ रुपये प्रति लिटर
पाकिस्तानच्या शहबाज शरीफ सरकारपुढे आर्थिक संकटाचे मोठे आव्हान असून महागाई नियंत्रणात आणणे कठीण झाले आहे. त्यात इंधनाच्या दराने उच्चांक गाठला असून त्याचा परिणाम इतर सर्व प्रकारची महागाई वाढण्यावर झाला आहे. कारण इंटरनॅशनल मॉनिटरी फंड अर्थात IMF कडून फंड मिळवण्याच्या नादात पकिस्तान सरकारने पेट्रोलचे दर २२.२० रुपयांनी वाढवले आहेत. त्यामुळे पाकिस्तानात पेट्रोलची किंमत २७२ रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे.
तर हायस्पीड डिझेलच्या किंमतीत १७.२० रुपयांनी वाढ केली असून, एक लिटर डिझेलसाठी २८० रुपये मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर केरोसिनच्या दरात १२.९० रुपयांनी वाढ केल्याने त्याची किंमत २०२.७२ रुपये इतकी झाली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.