हैदराबाद बलात्कार प्रकरणातील ४ आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार झाले आहेत. तेलंगाणाचे पोलीस महानिरिक्षक जितेंद्र यांनी ही माहिती दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी कोर्टानं या चारही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली होती. हैदराबादपासून ५० किमी अंतरावर असलेल्या चटनपल्ली गावात ही घटना घडली आहे.
घटनेच्या दिवशी टोंडुपल्ली टोल प्लाझाजवळ स्कूटी पार्क करून ती टॅक्सीने पुढे गेली. पण ती परतली तेव्हा तिच्या स्कुटीचे टायर पंक्चर झालेले होते. म्हणून मग स्कूटी तिथेच टोल प्लाझाजवळ सोडून टॅक्सीने घरी परतण्याचं तिने ठरवलं.
टोल प्लाझाजवळच्या दोन जणांनी पंक्चर काढतो असे सांगत तिची स्कूटी नेली. मृत तरुणीने आपल्या बहीण आणि भावाला फोनवरून याबाबत सांगितले होते. रस्त्यावर एकटं उभं रहायला भीती वाटतेय. अचानक काही लोक दिसू लागले आहेत आणि एक ट्रक आल्याचंही तिने फोनवर बोलताना सांगितलं होते.
थोड्या वेळात परत फोन करते असं सांगून तिने बहिणीसोबतच संभाषण संपवले. पण त्यानंतर फोन बंदच झाला. मृत तरुणीच्या कुटुंबाने टोल प्लाझाजवळ तिचा शोध घेतला आणि त्यांनतर शमशाबाद पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर शमशाबाद पोलीसांच्या शादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बांधकाम सुरू असलेल्या पुलाखाली अर्धवट जळलेला मृतदेह सापडला होता.
या घटनेमुळे महिलांच्या मनामध्ये असणारा रोष काही प्रमाणात का होईना कमी होईल. असे आपल्याला म्हणता येईल.