आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊत डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह; ‘नाडा’ने घातली तीन वर्षांची बंदी

पुणे, ४ मार्च २०२३ : नागपूर येथील आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊतवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. डोपिंग चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर नॅशनल अँटी डोपिंग असोसिएशनने (नाडा) रविवारी ही कारवाई केली. त्याची माहिती ॲथलेटिक इंटिग्रिटी युनिटला देण्यात आली आहे. निकिता ही नागपूर शहरातील तिसरी खेळाडू आहे, जिच्यावर डोपिंगविरोधी कारवाई करण्यात आली आहे.

निकिताने प्रतिबंधित ॲनाबॉलिक स्टिरॉइड घेतल्याचे तपासणीत आढळून आले. माहितीनुसार या पदार्थावर इंटरनॅशनल ॲथलेटिक्स फेडरेशनने ३० वर्षांसाठी बंदी घातली आहे. हा पदार्थ प्रामुख्याने स्रायूंची ताकद वाढविण्यासाठी वापरला जातो. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ‘नाडा’ने रविवारी निकितावर तीन वर्षांची बंदी घातली.

निकिताने गेल्यावर्षी बंगळुरू येथे झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले होते. ज्यामध्ये त्याने ५००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. प्रतिबंधित द्रवांसंदर्भातील नियमभंगासाठी तिला ही शिक्षा करण्यात आल्याचे ‘एआययू’ने म्हटले आहे. या प्रकरणानंतर डोपिंग चाचणी चर्चेचा विषय ठरली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा