मुंबई, ८ मार्च २०२३ : भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरचे महाराष्ट्राची राजधानी मुंबईत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. बुधवारी (ता. ८ मार्च) मुंबईच्या किनारपट्टीवर हेलिकॉप्टर आपत्कालीन स्थितीत उतरविण्यात आले. हेलिकॉप्टरमधील तीन जवानांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. नौदलाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, या आधुनिक हलक्या हेलिकॉप्टरने (एएलएच) नियमित उड्डाण केले होते; परंतु नंतर काही गडबडीनंतर ते मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळ उतरविण्यात आले.
नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गस्ती विमानाने ताबडतोब खात्री केली की, तीन क्रू मेंबर्स हेलिकॉप्टरमध्ये आहेत. त्यावर तातडीने कारवाई करीत तिन्ही जवानांना हेलिकॉप्टरमधून बाहेर काढण्यात आले. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे अधिकारी सांगतात.
नौदल अधिकाऱ्याने ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, भारतीय लष्कराचे एएलएच नियमित उड्डाण करीत असताना मुंबईच्या किनाऱ्याजवळ त्याचे नियंत्रण सुटले. शोध आणि बचावकार्य तत्काळ हाती घेण्यात आले आणि नौदल पेट्रोल क्राफ्टच्या तीनही क्रू मेंबर्सना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड