आणखी २७ शहरांत ‘जिओ’ची ‘५ जी’ सेवा

नवी दिल्ली, ९ मार्च २०२३ : देशातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी ‘रिलायन्स जिओ’ने बुधवारी १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आणखी २७ शहरांमध्ये ‘५ जी’ सेवा सुरू करण्याची घोषणा केली. यासह ‘जिओ’ने आतापर्यंत देशातील ३३१ शहरांमध्ये ‘५ जी’ सेवांचा विस्तार केला आहे.

जिओ ट्रू ५ जी आंध्र प्रदेश, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमधील २७ शहरांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या निवेदनानुसार ८ मार्च २०२३ पासून या २७ शहरांमध्ये जिओ वापरकर्त्यांना वेलकम ऑफर दिली जाईल.

याअंतर्गत कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय १ जीबीपीएसपर्यंतच्या वेगाने अमर्यादित डेटा मिळू शकतो. कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी यापूर्वी घोषणा केली होती की, २०२३ च्या अखेरीस ‘जिओ’ची ‘५ जी’ सेवा देशभरात पसरेल. ‘५ जी’ तंत्रज्ञान इंटरनेट ऑफ थिंग्ज, ऑगमेंटेड रिऍलिटी आणि व्हर्च्युअल रिॲलिटीसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षमता वाढविण्यासाठी मदत करतात. यामुळे आरोग्यसेवा, शिक्षण, शेती आणि राष्ट्रनिर्माण क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोगांचा मार्ग मोकळा होईल.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा