छत्रपती संभाजीनगर, १४ मार्च २०२३ : छत्रपती संभाजीनगर असे शहराचे नामांतर करण्यात आल्यानंतर मनसेच्या वतीने खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध केला होता. त्यांचा विरोध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले होते. पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे छत्रपती संभाजीनगर शहराच्या नामकरणाच्या समर्थनार्थ गुरुवारी (ता. १६ मार्च) सकाळी ११.३० वाजता संस्थान गणपती ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत स्वप्नपूर्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्यानंतर ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलीलनंपनन यांच्या नेतृत्वाखाली मागील दहा दिवसांपासून साखळी उपोषण करण्यात येत आहे. नामांतराच्या विरोधात कँडल मोर्चाही काढण्यात आला होता. या मोर्चाला पोलिसांची परवानगी नसल्याने हजारो मोर्चामध्ये सहभागी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातच मनसेकडून काढण्यात येणाऱ्या या स्वप्नपूर्ती रॉलीला पोलिसांची परवानगी देण्यात येते का? हाही प्रश्न आहे; पण या रॅलीला परवानगी जरी नाही मिळाली तरी ही रॅली काढण्यात येणार असल्याचा निर्धार मनसेच्या वतीने करण्यात आला आहे; तसेच छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या समर्थनार्थ स्वप्नपूर्ती रॅलीला हजारो जण सहभागी होणार असल्याचे मनसेच्या वतीने सांगितले जात आहे. या स्वप्नपूर्ती रॅलीच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांना शहराच्या नामांतराच्या समर्थनार्थ असलेलं पत्र देखील देण्यात येणार आहे.
शहराच्या नामांतराच्या हरकती व सूचना नोंदविण्याची शेवटची तारीख ही २७ मार्च आहे. यानंतर विभागीय आयुक्तांकडे मुदतीनंतर आलेल्या आक्षेप, समर्थन अर्जांचा विचार केला जाणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विनोद धनले