पंजाब, २१ मार्च २०२३: ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख, फरारी आरोपी अमृतपाल सिंग याचा पंजाब पोलीस शोध घेत आहेत. तो पंजाबमधून पसार झाला असवा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. सोमवारी अमृतपालचे कपडे आणि कार सापडल्यानंतर त्याने राज्याच्या सीमा ओलांडल्या असाव्यात, असा संशय पंजाब पोलिसांनी व्यक्त केलाय.
पोलिस ठाण्यावरील हल्लाप्रकरणी आतापर्यंत ११४ हून अधिक जणांना अटक करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे अमृतपालचा पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आय एसआय’शी असलेले लागेबांधे समोर आले आहेत. बंदी घातलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनल या खालिस्तानी संघटनेचा हॅंडलर असल्याचेही उघड झालंय.
पोलिसांनी सांगितलं की, सोमवारी अमृतपाल सिंग याची एक कार सापडली. कारबदलून त्याने शाहकोटला पलायन केलं. तेथून तो कपडे बदलून सहकाऱ्यांच्या मोटारसायकल वरुन पंजाबमधून पळून गेला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. गुप्तचर अहवालानुसार अमृतपाल सिंग ड्रग रिहॅब सेंटर आणि गुरुद्वाराचा वापर करून शस्त्रास्त्रांचा साठा करत होता. तरुणांची दिशाभूल करुन त्यांना आत्मघातकी हल्ले करण्यासाठी तयार करत होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर