ग्रीको रोमन अजिंक्य कुस्ती स्पर्धेमध्ये जयंत शेडगे तृतीय क्रमांकाचा मानकरी

फलटण, २८ मार्च २०२३: पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय ग्रीको रोमन अजिंक्य कुस्ती स्पर्धेमध्ये आसू येथील जय हनुमान तालीम मंडळाचा मल्ल जयंत नितीन शेडगे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. आसू येथील जय हनुमान तालीम मंडळाच्या जयंत शेडगे यांनी २५व्या वरिष्ठ ग्रीको रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

ते आसू येथील हनुमान तालीम मंडळाचे वस्ताद बाळासाहेब साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. उद्योजक श्रीमंत बंटीराजे खर्डेकर, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरू, पराजे खर्डेकर, युवा नेते विशालसिंह माने पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजीराव माने पाटील, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक स्वामी साबळे, मजूर फेडरेशनचे माजी चेअरमन प्रमोद अण्णा झांबरे, सरपंच महादेवराव सकुंडे, ग्रामपंचायत सदस्य ॲड.जीवन पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जयंत शेडगे यांचं अभिनंदन केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा