एलॉन मस्कने ट्विटरचा ब्लू-बर्ड लोगो बदलला, आता चिमणीएवजी डॉगचा फोटो लावणार

मुंबई, ४ एप्रिल २०२३: ट्विटरमध्ये आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. यावेळी एलन मस्क यांनी ट्विटरचा लोगोच बदलला आहे. म्हणजेच आता ट्विटरवरून निळी चिमणी गायब झाली आहे. आता प्रसिद्ध निळ्या चिमणीऐवजी श्वानाचा लोगो (Dog Logo) ट्विटरसाठी वापरण्यात आला आहे. हा बदल पाहून अनेक वापरकर्त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी यावर आश्चर्य देखील व्यक्त केले आहे.

अमेरिकन अब्जाधीश मस्क यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये ट्विटर विकत घेतले. यानंतर अनेक मोठ्या निर्णयांमुळे मस्क चर्चेत राहिले. यामध्ये ब्ल्यू टिकचे शुल्क, आकारण्या कर्मचाऱ्यांची छाटणी, सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी यांचा समावेश होता.

इलॉन मस्कने हा बदल केल्यावर डोगेकॉइनच्या किमती थोड्याच वेळात वाढल्या, कारण क्रिप्टोकरन्सी एका घसरणीत २० टक्क्यांहून अधिक वाढली, आणि काही महिन्यांत पहिल्यांदाच त्याची किंमत ०.१० टक्के झाली.

हा लोगो फक्त वेब पोर्टल साठी असून अधिकृत अँप वर पूर्वीचाच लोगो असणार आहे.

न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा