पुढील पाच दिवसांत राज्यातील “या” भागांत पावसाची शक्यता, गारपीटही होणार

पुणे, १२ एप्रिल २०२३: पुढील पाच दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर १२ ते १४ या कालावधीत मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता आहे. १३ एप्रिल रोजी कोकणात आणि १४ एप्रिल रोजी मराठवाड्यात गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

१५ एप्रिलच्या रात्रीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत देशातील अनेक भागांतील कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होईल. तर आजपासून पश्र्चिम बंगालमध्ये आणि उद्यापासून ओडिशामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

१२ ते १५ एप्रिल दरम्यान प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. त्यातही धुळे, नाशिक व नगर येथे गारपिटीसह पावसांचा अंदाज आहे, तर उर्वरित भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. अंसा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा