पुण्यात भूगर्भात तेल, वायू, ऊर्जा शोधणारे सॉफ्टवेअर विकसित

पुणे, २८ एप्रिल २०२३: भूगर्भाखालील तेल, वायू आणि ऊर्जा शोधण्यासाठी तंत्रज्ञान परदेशातून आणावे लागत होते. अगदी माफक खर्चात स्वदेशी बनावटीचे सॉफ्टवेअर पुण्यातील सीडॅकने विकसित केले आहे. याचाच एक भाग म्हणून हिंजवडी येथे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली पाहणे या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

हायड्रोकार्बनच्या ड्रीलिंग स्थानाबद्दल भुकंपानंतर तयार झालेल्या पृष्ठभागाची प्रतिमा गरजेची असते. भूकंपीय डेटा वापरून रिव्हर्स टाइम मायग्रेशन हे स्वदेशी बनावटीचे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. तेल आणि वायू हे ऊर्जानिर्मिती आणि त्यांच्या वाहतूकीचे प्रमुख घटक आहेत. जमिनीवर किंवा सागरी वातावरणात, तेल आणि वायूचे साठे शोधू शकतात.

तेल आणि वायू साठ्यांच्या शोध घेण्याकरिता त्यांच्याबद्दलचा डेटा गोळा करण्यासाठी भूकंपीय अन्वेषणाचे सर्वेक्षण केले जाते. हायड्रोकार्बन्सच्या ड्रिलिंगच्या स्थांनाबद्दल निर्णय घेण्यासाठी या प्रतिमा आवश्यक असतात. रिव्हर्स टाइम मायग्रेशन हे सध्या भूकंपीय डेटा वापरून भूपृष्ठाच्या संरचनेची प्रतिमा काढण्यासाठी सर्वांत प्रभावी पद्धत आहे. सी-डॅक, पुणे येथे सिस्मिक डेटा प्रोसेसिंग ग्रुपची स्थापना १९९२ मध्ये करण्यात आली आहे. हा ग्रुप प्रामुख्याने एचपीसी सिस्मिक इमेजिंग ऍप्लिकेशन्सच्या विकासावर काम करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा