नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर ४ फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत.
न्यायालयाचा निकाल : सदर वादग्रस्त जागेवर राममंदिर उभारण्यात यावे यासाठी ट्रस्टची स्थापना करावी. याशिवाय मशिदीसाठी अयोध्येत मध्यवर्ती ठिकाणी 5 एकर जागा मशीद बांधण्यासाठी देण्यात यावी.
या निकालावर आव्हान देणाऱ्या याचिका मौलाना मुफ्ती हसबुल्ला, महंमद उमर, मौलान महफूजर रेहमान व मिशबहुद्दीन यांनी दाखल केल्या आहेत.
या चार याचिकाकर्त्यांना अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाने पाठिंबा दिला आहे.