आसाममध्ये बिस्वा सरकार दारूचे व्यसन असणाऱ्या पोलिसांना पाठवणार सक्तीच्या स्वेच्छानिवृत्तीवर.

गुवाहाटी,आसाम ३ मे २०२३: दारूचे व्यसन असणाऱ्या पोलीस अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना व्हीआरएस देण्याचा नियम देशात आहे. पण आसाममध्ये हे पहिल्यांदाच घडत आहे. अशा प्रकारच्या स्वेच्छानिवृत्तीची माहिती मुख्यमंत्र्यांना होती. परंतु आसाममध्ये त्याची अंमलबजावणी कधीच झाली नव्हती. आता आसाम सरकार दारूचे व्यसन असलेल्या जवळपास ३०० पोलिसांना स्वेच्छानिवृत्ती योजनेचा (VRS) पर्याय देणार आहे.

मे महिन्यात आसाममधील भाजप सरकारला २ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशासनाचा कारभार सुधारण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत.

या प्रकरणी मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, ज्या पोलिसांना दारूचे व्यसन आहे, त्यांना त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावता येत नाही असा निष्कर्ष आहे. दारू प्यायल्याने त्यांच्या शरीरावरही वाईट परिणाम होतात. जनतेतूनही अशा पोलिसांविरोधात गंभीर तक्रारी वारंवार येतात. ड्यूटीवर असताना मद्य प्राशन केल्याप्रकरणी आसाम राज्यात अनेक पोलिसांना निलंबितही करण्यात आले आहे. दारू व्यसनामुळे पोलिसांबद्दल नकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याने आम्ही हा निर्णय घेतला.

सरकारच्या निर्णयानंतर आसाममध्ये पोलिसांना व्हीआरएस देण्याची प्रक्रिया सुरू झाली. महत्वाची बाब म्हणजे पोलिसांना पूर्ण पगार मिळत राहणार आहे. त्याचबरोबर निवृत्तीनंतरच्या रिक्त जागांवर सरकारकडून त्वरित नवीन भरती करण्यात येणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा