मणिपुर, ५ मे २०२३: मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय रेल्वे प्रशासनाने भारतातील इतर राज्यातून मणिपूरला जाणाऱ्या चार रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ५ मे ते ६ मे रोजी मणिपूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या बंद असणार आहेत, असे देखील भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ईशान्य सीमा रेल्वेने देखील मणिपुरला जाणाऱ्या सर्व गाड्या थांबवल्या आहेत. मणिपूरमधील परिस्थिती सुधारेपर्यत कोणतीही रेल्वे मणिपूरमध्ये दाखल होणार नाही. मणिपूर सरकारने रेल्वे वाहतूक थांबवण्याचा सल्ला दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ईशान्य फ्रंटियर रेल्वेचे सीपीआरओ यांनी ही माहिती दिली आहे.
अरुणाचल प्रदेश सरकारने आपल्या विधार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मणिपूर सरकारसोबत संपर्कात असल्याचे स्पष्ट केले आहे. मणिपूरमधून आमच्या विधार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अरुणाचलचे आयुक्त आणि सीएमओच्या देखरेखीखाली एक समन्वय समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. अशी माहिती अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर