दिल्ली, १६ मे २०२३: आज, १६ मे रोजी पंतप्रधान मोदींनी रोजगार मेळाव्याद्वारे विविध सरकारी विभागांमध्ये निवड झालेल्या ७१,००० तरुणांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नियुक्ती पत्र दिले. यासोबतच पंतप्रधानांनी निवडक तरुणांना संबोधित केले. देशातील २२ राज्यांमध्ये रोजगर मेळावा आयोजित करण्यात आला होता. केंद्र सरकारतर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी १० लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे, याच पार्शवभूमीवर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यात ७१ हजार निवडक तरुणांना ग्रामीण डाक सेवक, ग्रामीण पोस्टमॅन,पोलीस निरीक्षक, टिकीट क्लर्क, ज्युनिअर क्लर्स आणि टायपीस्ट, ट्रॅक मेंटनर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, सहाय्यक विभाग अधिकारी अशा विविध पदांवर नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्याचबरोबर सहायक कुलसचिव आणि सहायक प्राध्यापक या पदांचाही समावेश करण्यात आला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड