मुंबई, २१ मे २०२३: मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना सीबीआयने आज पुन्हा क्रुझ प्रकरणी आर्यन खानच्या ड्रग्जच्या संदर्भात चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणात सीबीआयने समीर वानखेडेची शनिवारी देखील सहा तास चौकशी केली होती. आजच्या चौकशीसाठी समीर वानखेडे हे सीबीआय कार्यालयात निघाले आहेत. यावेळी बोलताना समीर म्हणाले की, माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे.
आर्यन खान प्रकरणात २५ कोटींची मागणी आणि भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता असे आरोप असलेल्या आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी तब्बल सहा तास कसून चौकशी केली. मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास सीबीआयच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते.
अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याला कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करणारे राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई विभागाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन सीबीआय तपास करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर