सिडनी, २२ मे २०२३: ऑस्ट्रेलियातील सिडनी शहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. त्याचवेळी पीएम मोदी सिडनीतील हॅरिस पार्कचे नाव बदलून ‘लिटिल इंडिया’ करणार आहेत. सिडनी येथे येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान म्हणाले की ऑस्ट्रेलिया आणि भारत स्थिर, सुरक्षित आणि समृद्ध इंडो-पॅसिफिकसाठी वचनबद्ध आहेत. मित्र आणि भागीदार म्हणून एकत्र खेळण्यात आमची महत्त्वाची भूमिका आहे. याआधी आपल्या देशांमधील संबंधउ इतके घनिष्ठ कधीच नव्हते. पीएम मोदी सोमवारी पापुआ न्यू गिनी येथे भारत-पॅसिफिक द्वीपसमूह सहकार्य (FIPIC) मध्ये सामील झाले. ते आज तेथून सिडनीला रवाना होणार आहेत.
सिडनीमध्ये पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसह भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पीएम मोदी सिडनीतील हॅरिस पार्कचे नाव ‘लिटिल इंडिया’ ठेवतील. हॅरिस पार्क हा सिडनीचा परिसर आहे जिथे मोठ्या संख्येने भारतीय नागरिक राहतात. संपूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय नागरिकांची संख्या जास्त असली तरी हॅरिस पार्कमध्ये त्यांची संख्या खूपच जास्त आहे.
जपानच्या हिरोशिमा येथे झालेल्या जी-७ शिखर परिषदेत ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनीही पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. ते म्हणाले होते की सिडनीतील भारतीय समुदायाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्यांना इतक्या विनंत्या येत आहेत की त्यांना स्वीकारणे कठीण जात आहे. सिडनीतील ज्या हॉलमध्ये पीएम मोदींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, त्या हॉलची क्षमता २०,००० लोकांची आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड