जळगाव जिल्ह्यात कांदा आणि कापूस रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांनी राज्य सरकारचा नोंदवला निषेध

जळगाव,२५ मे २०२३ : जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांना कापूस आणि कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. याचा निषेध नोंदवण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा आणि कापूस फेकून दिला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारचा या ठिकाणी शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला.

जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील बिचवे येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. निसर्गाचा लहरीपणा आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच यावर्षी कापसाला आणि कांद्याला भावचं मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकासाठी केलेला खर्चही निघाला नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले.

शेतकऱ्यांनी यावर्षी कापूस वर्षभर घरात ठेवूनही राज्य सरकारकडून कापसाला योग्य ती किंमत मिळाली नाही.त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे यंदा कांदा खराब होऊन देखील पिकासाठी केलेला उत्पन्नाचा खर्चही यावर्षी निघाला नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून कांदा आणि कापूस रस्त्यावर फेकुन देत राज्य सरकारचा निषेध नोंदवला. या आंदोलनात महिला शेतकरी देखील सहभागी झाल्या होत्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा