हर हर गंगे मॅडल घे संघे, कुस्तीपटू आजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत

पुणे : ३० मे २०२३ : देशात एकीकडे नव्या संसदेचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. तर दुसरीकडे दिल्लीतील जंतर – मंतरवर कुस्तीपटूंची पोलिसांनी धरपकड केली. या घटनेला देशातील अनेक विविध स्तरावरून टीका केली जात आहे. अनेक कलाकार आणि खेळाडू कुस्तीपटूंचा समर्थनार्थ असल्याचे समोर आले आहे. लोकशाही असलेल्या देशात एका प्रकारे लोकशाहीची हत्या होत आहे अशी टीका सोशल मीडियावर अनेकांकडून करण्यात येत आहे.

भाजप नेता ब्रुजभूषण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या प्रकरणात ब्रूजभूषण सिंह यांच्यावर कारवाईच्या मागणी कुस्तीपटू कडून करण्यात येत आहे पण आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे कुस्तीपटू आणखी आक्रमक झाले. नव्या संसदेचा लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी संसदेवर कुस्तीपटू आपला मोर्चा घेऊन जाणार होते आणि संसदे बाहेरच महिला पंचायत करणार होते.

त्याच दिवशी पोलिसांनी ते कुस्तीपटू बरोबर हातापायी करत त्यांना ताब्यात घेतले. या घटनेचा अनेक स्तरावरून निषेध करण्यात आला. पण सत्तेत असलेल्या सरकारने कोणतेही दखल घेतली नाही. या घटनेची दखल न घेतल्यामुळे कुस्तीपटू यांनी देशासाठी कमावण्यात आलेले मॅडल गंगा नदी मध्ये विसर्जित करण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयामध्ये कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांचा समावेश आहे. मॅडल विसर्जित करण्याआधी कुस्तीपटूंना अश्रू अनावर झाले. भाजप नेता ब्रूजभूषण सिंह यांच्या विरोधात गेल्या १ महिन्यांपासून कुस्तीपटूच्या आंदोलनाला यश न मिळाल्यामुळे असा निर्णय घेण्यात आला. मॅडल विसर्जन केल्यानंतर सर्व आंदोलक कुस्तीपटू दिल्लीतील इंडिया गेट वर आमरण उपोषण साठी बसणार असल्याचे वृत्त आहे.

मॅडल विसर्जीत केले का ?
देशासाठी कमावण्यात आलेले मॅडल गंगा नदी मध्ये विसर्जित करण्याचा निर्णय घेतल्या नंतर शेतकरी नेते नरेश टिकैत तिथे दाखल झाले आणि त्यानंतर कुस्तीपटूंनी त्यांचा निर्णय मागे घेतला. कारवाईसाठी ५ दिवसांची मुदत द्या, असं टिकैत यांनी कुस्तीपटूंना म्हटल्यावर अखेर या कुस्तीपटूंनी त्यांचा निर्णय मागे घेतला.

देशासाठी ऑलम्पिक आणि विविध जागतिक स्तरावर कुस्तीपटूंनी नेहमीच चांगली खेळी करून एक आदर्श ठेवला आहे. पण त्यांच्यावर होणाऱ्या या अन्यायावर केंद्र सरकार बघायची भूमिका घेत असल्यामुळे आज अशी वेळ आली आहे. कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला अनेकांकडून समर्थन मिळते तर विरोध देखील होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : निखील जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा