मुंबई कोस्टल रोडला छत्रपती संभाजीं महाराजांचे नाव

पुणे, २ जून २०२३ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त आज (२ जून, शुक्रवार) रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या. त्यांनी मुंबई कोस्टल रोडचे नामकरण छत्रपती संभाजी राजे यांच्या नावावर करण्याची घोषणा केली. याशिवाय प्रतापगड प्राधिकरणाची अनेक वर्षांपासूनची मागणी मंजूर करून शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईची भावी जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पाचे नाव बदलून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज रस्ता असे नामकरण करण्याबाबत माहिती दिली होती. त्याची घोषणा आज करण्यात आली. मुंबईची वाहतूक समस्येतून सुटका करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. प्रतापगड प्राधिकरणाला मान्यता मिळाल्याची घोषणा करत त्यांनी उदयनराजे यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा