सरीसृप- क्रॅस्टोस कोरल स्नेक (Castoes Coral Snake)

5

अतिशय दुर्मिळ असलेला हा साप, क्रॅस्टोस कोरल स्नेक (Castoes Coral Snake) म्हणजेच पोवळा साप म्हणुन ओळखला जातो. पोवळा सापामध्ये स्ट्राइप कोरल स्नेक आणि क्रॅस्टोज कोरल स्नेक अशा दोन प्रजाती आहेत. क्रॅस्टोस कोरल स्नेक हा फार दुर्मिळ आहे. हा साप जास्त करून पश्चिम घाटात आढळून येतो. पण प्रत्यक्षात तो फार कमी दिसतो. त्यामुळे तो दुर्मिळ मानला जातो. विषारी प्रजातीमध्ये मोडला जाणार हा साप फारसा दृष्टीस पडत नाही. साधारणपणे दोन ते अडीच फुटापर्यंत या सापाची लांबी असते. करंगळी एवढ जाड याच शरीर असून बरोबर डोक्यावरती भगवी जाड रेषा असते. साधारणपणे दोन ते अडीच फुटापर्यंत या सापाची लांबी असते. करंगळी एवढ जाड याच शरीर असून बरोबर डोक्यावरती भगवी जाड रेषा असते. वरून बघितल्यानंतर मण्यार सारखा दिसणारा हा साप पोटा खालून पूर्णपणे भगवा असतो. त्याचा भगवा रंग हा, तो जहाल विषारी असल्याचे द्योतक मानले जाते. दगडाखाली आणि पालापाचोळ्यात हा साप नेहमी आढळतो. त्याचे भक्ष छोटे बेडूक, सरडे, पाली गांडूळ इत्यादी आहे. पट्टेरी पोवळा हा एक दुर्मिळ साप असून तो पश्चिम घाटातील जास्त आर्द्रतेच्या प्रदेशात आढळतो. स्थानिक लोक याला रात साप या नावाने ओळखतात. हा साप लहान सापांना खातो. याला धोका वाटल्यास शेपटी गोलाकार गुंडाळून शेपटी खालच्या लालसर भागाचे प्रदर्शन करून शत्रूला इशारा देतो. या सापाची मादी पावसाळ्यात तीन ते सहा अंडी घालते. हा साप दुर्मिळ असल्यामुळे या सापाच्या मानवी दंशाचे प्रमाणही कमी आहे. अतिशय लहान दातांमुळे याचा दंश माणसास झाल्यास त्या ठिकाणी जळजळ होऊन सूज येणे व श्वास घेण्यास अडचण होणे ही लक्षणे दिसून येतात, पण मृत्यू होत नाही.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा