नेपाळमध्ये ‘आदिपुरुष’सह सर्व भारतीय सिनेमांचे स्क्रीनिंग बंद

काठमांडु, नेपाळ २० जून २०२३: ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या निमित्ताने सुरू झालेले वाद वाढू लागल्याचे पाहून नेपाळ सरकारने काठमांडूत भारतीय सिनेमांचे स्क्रीनिंग बंद केले आहे. काठमांडूत ठिकठिकाणी ‘आदिपुरुष’या सिनेमाविरोधात आंदोलनं झाली. वातावरण तापत असल्याचे बघून नेपाळ सरकारने, काठमांडूत सरसकट सर्व भारतीय सिनेमांचे स्क्रीनिंग बंद केले.

नेपाळने चित्रपटावर बंदी घातल्यानंतर T-Series ने आता काठमांडू मेट्रोपॉलिटन सिटीचे महापौर बालेन शाह आणि नेपाळच्या चित्रपट विकास मंडळाला माफीनामा-पत्र लिहुन माफी मागण्याबरोबरच, नेपाळ चित्रपट विकास मंडळाने याकडे एक कला म्हणून पाहावे, असे आवाहन देखील केले आहे.

वादाचा मुद्दा म्हणजे, नेपाळ आणि भारता मध्ये सीतेच्या जन्मभूमी मुद्यावरून, अनेक काळापासून वाद सुरू आहे. आता हाच वाद ‘आदिपुरुष’या सिनेमाला भोवला आहे. सिनेमात सीता जन्माबाबत जे उल्लेख आहेत त्यांच्यावर नेपाळमधून आक्षेप घेण्यात आलाय. हे उल्लेख काढून टाकावेत नाही तर हा सिनेमा नेपाळमध्ये दाखवू नये अशी भूमिका देखील नेपाळी नागरिकांनी घेतली आहे. नागरिक ‘आदिपुरुष’ सिनेमाविरोधात आक्रमक झाले आहेत.

नेपाळमधील नागरिकांचे म्हणणे आहे की सीतेचा जन्म हा नेपाळमधील जनकपुर येथे झाला. तर या संदर्भात भारतीयांचे म्हणणे आहे की सीतेचा जन्म हा बिहारमधील सीतामढी या ठिकाणी झालाय. काठमांडूच्या महापौरांनी फेसबुक पोस्ट करून काठमांडूत ‘आदिपुरुष’सह सर्व भारतीय सिनेमांचे स्क्रीनिंग बंद केल्याचे जाहीर केले. आदिपुरुष हा चित्रपट पुढचा आठवडा येईपर्यंत सिनेमागृहात दिसणार, की प्रेक्षक त्याकडे पाठ दाखवणार हे येत्या आठवड्यात कळेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा