महाजनसंपर्क अभियानाचा अहवाल सादर करा, भाजप खासदारांना आदेश

नवी दिल्ली २१ जून २०२३: देशातील सार्वत्रिक निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपल्याने सर्व पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. भाजप काँग्रेस आणि इतर पक्षांनी विशेष प्रचार अभियान आधीच सुरू केले आहे. याच अनुषंगाने भाजपने राबवलेल्या महाजनसंपर्क अभियानांचा विस्तृत अहवाल सादर करण्याचे निर्देश भाजपने खासदारांना दिले आहेत.

महाजनसंपर्क अभियानादरम्यान, भाजप खासदारांनी कुठल्या एक हजार विशिष्ट लोकांच्या भेटीगाठी घेतल्या आणि कुठल्या कार्यकत्यांनी संपर्क अभियान राबविले याची विस्तृत यादी उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही भाजप वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत. भाजप समाज माध्यमांवरही प्रचार अभियान राबवत आहे. खासदारांकडून सोशल मीडिया इंन्फ्लूएंसर्स आणि यूट्यूबर्सच्या आयोजनासंबंधीही अहवाल मागवण्यात आल्याचे कळते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील २ हजार ५०० निवडक प्रतिनिधीसोबत, ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून २७ जूनला संवाद साधणार आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण १५ हजार मंडल स्तरावर भाजप करणार असुन पक्षाचे खासदार-आमदार या कार्यक्रमात उपस्थित राहतील. याशिवाय व्यापारी, संयुक्त मोर्चा संमेलन आणि लाभार्थी संमेलन या गोष्टींच्या आयोजनाचेही निर्देश देण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा