नरेंद्र मोदी यांचे व्हाईट हाऊसमध्ये जल्लोषात स्वागत, पंतप्रधानांकडून बायडन यांना खास भेट वस्तू भेट

वॉशिंग्टन, अमेरिका २२ जून २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या वॉशिंग्टन येथील एका कार्यक्रमात भाग घेतला. त्यानंतर मोदी व्हाईट हाऊसमध्ये गेले. तिथे राष्ट्रपती जो बायडेन यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन आणि जिल बायडेन यांना खास भेट वस्तू दिल्या. भारतातील महाराष्ट्रासह दहा राज्यातील महत्त्वाच्या वस्तू मोदी यांनी राष्ट्रपतींना भेट दिल्या, तसेच जिल बायडेन यांना एक हिराही भेट म्हणून दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेल्या वस्तूंमध्ये, राजस्थानमधील हाताने बनवलेलं २४ कॅरेट हॉलमार्कचं सोन्याचं नाणं, तसेच ९९.५ टक्के कॅरेट चांदीचे नाणे, पंजाबचे तूप, महाराष्ट्राचा गुळ,उत्तराखंडचे तांदूळ, तामिळनाडूचे तिळ,कर्नाटकातील मैसूरमधील चंदनाचा तुकडा, पश्चिम बंगालच्या कुशल कारागिरांनी तयार केलेले चांदीचे नारळ, गुजरातचे मीठ, श्रीगणेशाची मूर्ती तसेच दिवा आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना ७.५ कॅरेटचा हिरवा हिरा भेट दिला, हा हिरा पृथ्वीवरील ऑप्टिकल आणि रासायनिक गुण दर्शवतो. हा हिरा पर्यावरण अनुकूलही आहे, कारण या हिऱ्याच्या निर्मितीसाठी पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेचा वापर करण्यात आला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हाईट हाऊसमध्ये प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आले. फर्स्ट लेडीने केलेल्या या आदरतिथ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून हे आभार मानले. जो बायडेन आणि जिल बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये माझा जो आदर सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद, आमच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली असे ट्विट मोदी यांनी केले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी स्टेट डिनरचे आयोजन करण्यात आलय. मोदींच्या डिनरमध्ये बाजऱ्याचा केक आणि मशरुमचा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण शाकाहारी डिनर असणार आहे. फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी गेस्ट शेफ नीना कर्टिस, व्हाईट हाऊस एक्झ्युक्युटिव्ह शेफ क्रिस कोमरफोर्ड आणि व्हाईट हाऊस एक्झिक्युटिव्ह पेस्ट्री शेफ सूजी मॉरिशन यांच्यासोबत स्टेट डिनर मेन्यू तयार केला आहे.

या स्टेट डिनरमध्ये फर्स्ट कोर्समध्ये मॅरिनेटेड मिलेट, ग्रिल्ड कोर्न कर्नेल सॅलेड, कॉम्प्रेस्ड वॉटरमेलन आणि टॅगी अॅवेकैडो सॉसचा समावेश आहे. तर मेन कोर्समध्ये स्टफ्ड पोर्टोबेलो मशरूम, क्रीमी सॅफरन इन्फ्यूज रिसोटोचा समावेश आहे. त्याशिवाय सुमैक रोस्टेड सी-बास, लेमन योगर्ट सॉस, क्रिस्प्ड मिलेट आणि समर स्क्वॅशचा समावेश आहे. रात्री व्हाईट हाऊसच्या साऊथ लॉनवर हे डिनर दिले जाणार आहे. तिरंग्याच्या थीमवर साऊथ लॉन पॅव्हेलियन सजवले गेले आहे.

न्यूज अन कट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा