पुणे २४ जून २०२३: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी असुन, आता तरुणांना लवकरच चांगल्या सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. राज्यात २०७० पदे भरली जाणार आहेत, त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेतही शिक्षक भर्ती होणार आहे. आता या प्रस्तावावर निर्णय होणे बाकी आहे. येत्या काही दिवसांत या जागांसाठी जाहिरात निघेल. या गोष्टीने राज्यात शिक्षण आणि कृषी विभागात रिक्त असलेली, ८० टक्के पदे भरली जाणार
कृषी विभागतील नव्या भरतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. यावर लवकरच निर्णय होणार आहे, अशी माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. कृषी विभागातील ८०% रिक्त पदे भरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि लातूर या विभागात ही भर्ती होणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ९० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु शिक्षकांच्या ५०८ जागा रिक्त आहेत. आता या जागा भरण्यात येणार असुन सहा महिन्यांसाठी करार पद्धतीने पुणे महापालिकेकडून ही शिक्षक भर्ती करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त ५०८ जागांपैकी, ३२९ शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार. ही भर्ती झाल्यानंतरही शिक्षकांच्या १७९ जागा रिक्त राहणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर