बंगालमधील बांकुरा येथील ओंडा रेल्वे स्थानकाजवळ दोन मालगाड्यांचा भीषण अपघात

पश्चिम बंगाल २५ जून २०२३: पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे आज सकाळी मोठा रेल्वे अपघात झाला. येथील ओंडा रेल्वे स्थानकाजवळ दोन मालगाड्यां एकमेकांवर आदळल्या. ही टक्कर इतकी भीषण होती की दोन्ही मालगाड्यांचे इंजिन केवळ रुळावरून घसरले नाही तर जागीच उलटले. यामध्ये रेल्वे ट्रॅक आणि मालबोग्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या घटनेनंतर खरगपूर-बांकुरा-आद्रा रेल्वे मार्ग बंद करण्यात आला. या घटनेत किती नुकसान व जीवितहानी झाली याबाबतची माहिती सध्यातरी समोर आलेली नाही. अपघाताचे कारण आणि दोन्ही गाड्या एकमेकांना कशा धडकल्या हे तपासानंतरच स्पष्ट होईल, असे सुरक्षा अधिकारी दिबाकर माली यांनी सांगितले. या अपघातात मालगाडीचे अनेक वॅगन्स आणि इंजिन रुळावरून घसरले.

ओडिशातील बालासोर येथे घडलेल्या भीषण रेल्वे अपघाताच्या आठवणी अजून ताज्या असतानाच, पुन्हा हा भीषण रेल्वे अपघात झाल्याने सर्वत्र खळबळ उडालीय. सुदैवाने या दोन्ही मालगाड्या असल्याने यामध्ये मोठ्या जीवितहानीला सामोरे जावे लागणार नाहीए, मात्र असे असले तरी या अपघाताने रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा