हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, ६ जणांचा मृत्यू,१० जण जखमी

शिमला,हिमाचल प्रदेश २६ जून २०२३: हिमाचलमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हाहाकार माजला आहे. राज्यात अनेक ठिकाणी सुरु असलेल्या मुसळधार पावसाने आत्तापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून सुमारे १० जण जखमी झाले आहेत, तर ३०३ जनावरांचा मृत्यू झाला, अशी माहिती हिमाचल प्रदेश आपत्ती व्यवस्थापनाचे प्रधान सचिव ओंकार चंद शर्मा यांनी दिली.

पुढे शर्मा यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे राज्यातील ६ मोठ्या पाणीपुरवठा योजना बाधित झाल्या असुन स्थानिकांच्या मदतीने अनेक पर्यटकांची सुटका करण्यात आलीय. आम्ही येथे येणाऱ्या सर्व पर्यटकांना, राज्य सरकार आणि आपत्ती व्यवस्थापनाद्वारे जारी केलेल्या सर्व आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची विनंती करत असल्याचेही शर्मा यांनी म्हटले आहे.

हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर सुरुच आहे. मुसळधार पावसामुळे मंडी जिल्ह्यातील सेराज खोऱ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. सेराज येथील तुंगाधार येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात अनेक वाहने वाहून गेली. कुल्लू जिल्हा मुख्यालयाजवळील दोहरनाल भागात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोहल खड्डामध्ये मोठा पुर आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा