तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव पंढरपूरकडे रवाना, आमदार खासदारांसह उद्या घेणार विठुरायाचे दर्शन

मुंबई २६ जून २०२३: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आज दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यादृष्टीने सोलापूरात त्यांच्या स्वागताची जंगी तयार करण्यात आलीय. केसीआर हे त्यांच्या खासदार आमदारांसह उद्या पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेणार आहेत. तेलंगणातून निघालेल्या त्यांच्या ताफ्याचा आज सोलापूर येथे पहिला मुक्काम आहे.

बीआरएस पक्षाचे महाराष्ट्रात विस्तारीकरण व्हावे यासाठी केसीआर सध्या जोमाने काम करत आहेत. बीआरएस पक्षाची महाराष्ट्रात एन्ट्री करण्यासाठी त्यांनी पहिली सभा नांदेड येथे घेतली. यानंतर त्यांनी आपला मोर्चा विदर्भाच्या दिशेने वळवून नागपूर येथे सरपंच परिषद भरवली. यानंतर आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यामध्ये पालखी प्रस्तानापासून जागोजागी “अबकी बार किसान सरकार” या ब्रीदवाक्यसह त्यांचे फोटो छापून लावलेले बोर्ड पालखी महामार्गावर झळकताना दिसत आहेत.

आता केसीआर हे त्यांच्या खासदार आमदारांसमवेत ४०० वाहनांच्या ताफ्यासह हैद्राबादहून येतायत. प्रत्येक गाडीवर गुलाबी झेंडा लावल्याने गुलाबी वादळ हे महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याचे चित्र दिसतय. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके हे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासह अजून काही नेत्यांचा देखील पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे.

उद्या केसीआर हे पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरात आपल्या सर्व आमदार खासदारांसह विठुरायाचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान केसीआर यांच्याकडून पालखी सोहळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव राज्य सरकारकडून त्यांना पुष्पवृष्टी करण्यास परवानगी नाकारण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा