मुंबई २८ जून २०२३: जागतिक युनिव्हर्सिटी रँकिंग २०२३ ने विद्यापीठांची रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये भारतातील ४५ विद्यापीठांनी स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे आयआयटी बॉम्बेने टॉप १५० संस्थांच्या यादीत स्थान मिळवले असुन एखाद्या भारतीय उच्च शैक्षणिक संस्थेने क्यूएस च्या सर्वोच्च यादीत स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही शैक्षणिक क्षेत्रातील भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उच्च आणि दर्जेदार शिक्षण आता भारतातही मिळत आहे.
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२३ ने आज, २८ जून रोजी विद्यापीठ क्रमवारी जाहीर केली. ही त्याची २० वी आवृत्ती आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२३ मध्ये आयआयटी बॉम्बे, सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत १४९ व्या स्थानावर आली आहे. गेल्या वर्षी जाहीर झालेल्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीत आयआयटी बॉम्बे १७६ व्या स्थानावर होते. २०१६ मध्ये, आयआयएससी म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला १४७ वा क्रमांक मिळाला.
क्यूएस ने जाहीर केलेल्या अधिकृत प्रकाशनानुसार, आयआयटी बॉम्बेला एकाधिक पॅरामीटर्सवर आधारित १०० पैकी ५१.७ गुण मिळाले आहेत. यामुळे संस्थेने पहिल्या १५० संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यादीत २३ संस्थांनीं प्रगती केली आहे. क्यूएस ने यावर्षी २९०० संस्थांचे रँकिंग तयार केलय. या क्रमवारीत ४५ भारतीय संस्थांना स्थान मिळाले आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२३ जारी करताना, त्याचे संस्थापक आणि एसईओ नुन्झिओ क्वाक्वेरेली यांनी आयआयटी बॉम्बेचे आतापर्यंतच्या सर्वोत्तम रँकबद्दल अभिनंदन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड