नवी दिल्ली २८ जून २०२३: भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी अजय भटनागर यांची केंद्रीय अन्वेषण विभागात विशेष संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मनुष्यबळ मंत्रालयाने यासंदर्भात आदेश काढले आहेत. झारखंड कॅडरच्या १९८९ तुकडीचे आयपीएस अधिकारी भटनागर, हे सध्या सीबीआयमध्ये अतिरिक्त संचालक पदावर कार्यरत आहेत. आदेशानुसार सेवानिवृत्ती पर्यंत २० नोव्हेंबर २०२४ भटनागर या पदावर राहतील.
सीबीआयचे संयुक्त संचालक असलेले अनुराग यांची, अतिरिक्त संचालक पदी नियुक्ती करण्यात आलीय. २४ जुलै २०२३ पर्यंत ते या पदावर राहतील. गुजरात कॅडरमधील १९९४ तुकडीचे आयपीएस अधिकारी मनोज शशीधर यांची देखील तीन वर्षासाठी सीबीआयमध्ये अतिरिक्त संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते तपास संस्थेत संयुक्त संचालक पदावर कार्यरत आहेत.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने आयपीएस कार्यकाळ धोरणातून सवलत देत, सीबीआयचे संयुक्त संचालक शरद अग्रवाल यांचा प्रतिनियुक्तीचा काळ, ३१ मे २०२३ पासून एक वर्षासाठी म्हणजेच १ जून २०२३ ते ३१ मे २०२४ पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे, असे ही या आदेशातून स्पष्ट करण्यात आलय.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर