मुंबई, ३० जून २०२३: नुकताच ‘कौन बनेगा करोडपती’ १५ व्या सिझनच प्रोमो व्हिडिओ लाँच करण्यात आला. बिग बी अमिताभ बच्चन पुन्हा एकदा ‘सही जवाब’ म्हणत, नवीन रूपातल्या कौन बनेगा करोडपतीच्या १५ व्या सीझनसह टीव्हीवर दिसणार आहेत. सोनी टीव्हीच्या अधिकृत हँडलने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. चॅनलने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, कौन बनेगा करोडपती लवकरच एका नवीन रूपात पहा!
या प्रोमो व्हिडिओची सुरुवात, एक महिला संगणकावर व्हर्च्युअल मीटिंग घेत असलेल्या शॉटने होते. बैठक घेताना ही महिला आपल्या मुलासोबत टेबलाखालून फुटबॉल खेळत आहे. यादरम्यान अमिताभ बच्चन कवितेसोबत मल्टीटास्किंग आणि टाइम मॅनेजमेंटबद्दल बोलत आहेत. यानंतर एक व्यक्ती ट्रॅफिकमध्ये माल विकण्यासाठी, रोख रकमेऐवजी डिजिटल पेमेंट करण्यास सांगत आहे. त्याच्या हातावर क्यूआर स्कॅनर टॅटू गोंदवला आहे. या व्हिडिओमध्ये शोचे होस्ट अमिताभ बच्चन भारतातील बदलांवर बोलताना, दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराविषयी माहिती देतायत. तसेच त्यांनी केबीसीच्या १५ व्या सीझनमधील आगामी बदलांकडेही या प्रोमोद्वारे लक्ष वेधले. बिग बी या प्रोमोमध्ये कंटेंट क्रिएटर, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि छोट्या व्यावसायिकांबद्दलही बोलले आहे. तंत्रज्ञानामुळे कुटुंबांमधील अंतर कमी झाले आहे.
कौन बनेगा करोडपती च्या १५ व्या सिझनसाठी या वर्षी एप्रिलमध्ये नोंदणी सुरू झाली. आता या शोचे शूटिंग पुढील महिन्यात सुरू होणार असून ऑगस्टपर्यंत हा शो टीव्हीवर प्रदर्शित होईल. केबीसीचा पहिला सीझन २००० साली आला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत फक्त अमिताभ बच्चन हा शो होस्ट करताना दिसत आहेत. एक अपवाद की, या शोचा तिसरा सीझन शाहरुख खानने होस्ट केला होता. या १५ व्या सिझनच्या प्रोमो व्हिडिओच्या शेवटी अमिताभ बच्चन म्हणतात की, भारतातील तंत्रज्ञानाच्या सर्व गोष्टी प्रगती आणि बदलांकडे निर्देश करतात.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे.