मुंबई, ४ जुलै २०२३: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षकार्यालयासाठी मंत्रालयासमोरील ए-५ हा शासकीय बंगला देण्यात आला आहे. या कार्यालयाचे आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण आहे. सध्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील बेलॉर्ड पियर येथे प्रदेश कार्यालय आहे. आता अजित पवार यांनी वेगळी वाट धरल्यामुळे त्यांच्या गटांसाठी सरकारने मंत्रालयासमोरील ए-५ हा शासकीय बंगला दिला आहे.
दादर येथील जुने शिवसेना भवन पाडून त्याच जागेवर नवीन शिवसेना भवन उभारण्यात येणार होते. त्यासाठी तात्पुरती सोय म्हणून शासनदेश काढून तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचा सी-४ हा मंत्रालयासमोरील शासकीय बंगला पक्ष कार्यालयासाठी दिला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी याच रांगेतील शासकीय बंगला कार्यालयासाठी देण्यात आला आहे. बाळासाहेब भवन या नावाने हा बंगला ओळखला जात आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर