सोलापूर, ८ जुलै २०२३ : सोलापूर जवळील कुंभारी येथे, असंघटित कामगारांसाठी उभारण्यात येत असलेल्या ३० हजार घरकुलांपैकी १५ हजार घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्याची पाहणी केंद्रीय समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे उपसचिव एस.के. बाबर यांनी या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा घेतला.
कुंभारी येथील देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण सोसायटीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी बाह्य आणि अंतर्गत सेवासुविधांचा आढावा केंद्रीय समितीने घेतला आहे. या ठिकाणी पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, शिक्षण, अंगणवाडी आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठीच्या काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, यांचा आढावा या समितीने घेतला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा होणार आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी पुरविण्यात येणाऱ्या सेवासुविधांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य अभियंता सुनील जाधव, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता संतोष गाडेकर यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर