नाशिक, १२ जुलै २०२३ : नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर भीषण अपघात झाला आहे. देवीचे दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांची बस, थेट दरीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. एसटी बस ही सप्तशृंगी गड खाली उतरत असताना अवघड वळणावर हा अपघात झाल्याचे समजते. या अपघातात एकजण ठार झाला असून २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नाशिकच्या सप्तशृंगी गडावर बस दरीत कोसळून अपघात झाला आहे. आज पहाटे ६.३० ते ६.४५ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. सप्तश्रृंगी देवीचे दर्शन करून भाविक येत असताना बस दरीत कोसळली. शार्प टर्नवर घाटातील गणपती पॉइंटजवळ हा अपघात झाला. बस दरीत कोसळल्याने एक प्रवाशी जागीच ठार झाला तर अपघातात २० ते २५ प्रवासी जखमी झाले. या सर्व जखमींना नांदुरी आणि वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवले. पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. ही बस खामगाव डेपोची असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर