पुणे, १२ जुलै २०२३: आज संध्याकाळी ७.३० वाजता, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात १२ जुलै ते १६ जुलै २०२३ दरम्यान खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. हा सामना विंडसर पार्क, रोसेओ, डॉमिनिका येथील मैदानावर होणार आहे.
टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील द्विपक्षीय मालिकेतील पहिल्या २ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. त्यानंतर ३ वनडे आणि ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील. २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना २० जुलै ते २४ जुलै दरम्यान, क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे खेळवला जाईल. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण डीडीवर केले जाईल. आणि, त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग Jio सिनेमा, Disney + Hotstar आणि Fancode अॅपवर केले जाईल.
भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत, इशान किशन (यष्टीरक्षक), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मुकेश कुमार, अक्षर पटेल, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट.
वेस्ट इंडिजचा संघ: क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवूड ( उप-कर्णधार), जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), अलिक अथानागे, रहकीम कॉर्नवॉल, रॉनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, रेमन रेफर, केमार रोच, टॅगेनारिन चंद्रपॉल, कर्क मॅककेन, क्रेझन जोमेल वॅरिकन.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड