मुंबई, १८ जुलै २०२३ : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अडानी यांनी आज वार्षिक जनरल मिटिंग द्वारे त्यांच्या कंपनीच्या भागीधारकांना संबोधित केले. यावेळी अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्ग अहवालावर त्यांनी आरोप केले. ते म्हणाले की, चुकीच्या माहितीद्वारे आमच्यावर हल्ला करण्यात आला. आमच्या प्रतिनिधीत्वावर हा मुद्दाम केलेला हल्ला होता, जेणेकरून आमच्या स्टॉकची किंमत कमी होईल.
२४ जानेवारी २०२३ रोजी हिंडेनबर्ग कंपनीने एक अहवाल जाहीर करत, अडानी ग्रुपच्या लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स ओव्हरव्हॅल्युड असल्याचं तसेच अडानी ग्रुपनं शेल कंपन्यांच्या माध्यमातून अकाउंट मध्ये फेरफार केल्याचा आरोपही केला होता. अडानी समूहाच्या २०२३ च्या वार्षिक वार्षिक जनरल मिटिंग मध्ये बोलताना गौतम अदानी म्हणाले की, हिंडनबर्गनं अदानी समूहाची प्रतिमा खराब करण्याच्या हेतूने हा अहवाल जाहीर केला होता. शेअर्सच्या मोल तसेच शेअरच्या किमती घसरून नफा कमावणं हा अहवालाचा उद्देश असल्याचंही अडानी म्हणाले आहेत.
तसेच गौतम अडानी म्हणाले की, हिंडनबर्गचा अहवाल आल्यानंतर आम्ही तो फेटाळला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली. हा अहवाल मे २०२३ मध्ये सार्वजनिक करण्यात आला आणि त्यामध्ये तज्ज्ञ समितीला कोणत्याही प्रकारच नियामक त्रुटी आढळल्या नाहीत. हिंडेनबर्ग अहवालानंतर एफपीओचे पूर्ण सदस्यत्व असूनही, आम्ही गुंतवणूकदारांची बाजू घेत पैसे परत करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, २७ जानेवारी रोजी अडानी समूहानं त्यांची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा FPO जारी केला आणि नंतर पूर्ण सब्सक्राइब घेतल्यानंतर अचानक तो मागे घेतला. २० हजार कोटी रुपयांचे एफपीओ काढून कंपनीनं सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत केले होते. हिंडेनबर्गनं जाहीर केलेल्या अहवालात अडानी समूहावर खात्यातील फसवणूक आणि स्टॉक व्हॅल्यूमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे, अडानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती, ज्यामुळे समूहाचे बाजार मूल्य नीचांकी पातळीवर पोहोचले आणि ते सुमारे १४५ अब्ज डॉलर्स ने खाली पडले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे