मुंबई, २३ जुलै २०२३ : आलिया भट्ट आणि रणवीर सिंग हे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या त्यांच्या नव्या कोऱ्या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशन साठी दोघांनी अलीकडेच बरेलीच्या आयकॉनिक झुमका चौकाला भेट दिली, त्यावेळी त्यांच्या रंगीबेरंगी अवताराने लोकांचे लक्ष वेधले.
इंस्टाग्रामवर धर्मा प्रॉडक्शनच्या अधिकृत पेज ने एक फोटो टाकलाय आणि कॅप्शन मध्ये लिहिले, ‘रॉकीला अखेर राणीचा झुमका बरेली येथे सापडला! हार्दिक स्वागताबद्दल धन्यवाद’ !! या कृतज्ञ पूर्ण शब्दात धर्मा प्रोडक्शनने चाहत्यांचे आभार मानले. दुसरीकडे रणवीरने आपल्या डॅपर लूकने सगळ्यांना थक्क करून सोडले. काळ्या रंगाच्या पोशाखात तो चमकत होता. त्याच्या मस्त हेअरस्टाइलचा एक वेगळाच थाट होता. तर आलिया भट आकर्षक पिवळ्या साडीत आणि सोबर मेकअप मध्ये खुलून दिसत होती.
चित्रपट निर्माता करण जोहर सात वर्षांनी पुनरागमन करत आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये रणवीर, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि हा चित्रपट २८ जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. जोहरच्या कथानाकात प्रभावी कलाकार, भव्यता आणि संगीत यांचे मिश्रण करून हा चित्रपट मोठ्या पडद्यावर मनोरंजन करणारा ठरेल. तर आलीय आणि रणवीर या जोडीने देखील अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे