नवी दिल्ली, २९ जुलै २०२३ : जागतिक बाजारातील सुप्रसिद्ध दिग्गज कार निर्माती कंपनी होंडा ही भारतीय बाजारपेठेत एक नवीन कार लॉंच करणार आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीस ही Honda’s Elevate कार भारतीय बाजारपेठेत लॉंच होणार आहे. होंडा एलिव्हेटसाठी ५००० रुपयांच्या टोकन रकमेवर जुलैच्या सुरुवातीपासून बुकिंग सुरू आहे. SV, V, VX आणि ZX या चार मोठ्या प्रकारांमध्ये होंडा एलिव्हेटची विक्री करेल. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही पर्यायांसह पेट्रोल-इंजिनचाही पर्याय यात आहे.
कॉम्पॅक्ट SUV वैशिष्ट्यांच्या यादीमध्ये वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सह १०.२५ -इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ७-इंच सेमी-डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि सिंगल-पेन सनरूफ यांचा समावेश आहे. बोर्डवरील इतर वैशिष्ट्यांमध्ये पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि क्रूझ कंट्रोल यांचा समावेश आहे. वैशिष्ट्यांच्या हायलाईट्समध्ये १०.२५-इंच टचस्क्रीन, सिंगल-पेन सनरूफ आणि ADAS समाविष्ट आहेत. Honda ने Elevate ला सुरक्षितता तंत्रज्ञान जसे की अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम ADAS सहा एअरबॅग्ज, एक लेनवॉच कॅमेरा, आणि ISOFIX चाईल्ड सीट अँकरेजसह असेल.
एलिवेट सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या दरम्यान बाजारपेठेत लॉंच होऊ शकते. Honda Elevate मध्ये १.५-लिटर NA पेट्रोल इंजिन सहा-स्पीड मॅन्युअल आणि CVT युनिटसह जोडलेले आहे. गॅसोलीन मोटर 119bhp आणि 145Nm पीक टॉर्क जनरेट करते, ARAI-प्रमाणित इंधन कार्यक्षमतेचे आकडे मॅन्युअल प्रकारासाठी 15.31kmpl आणि स्वयंचलित प्रकारासाठी 16.92kmpl असेल. एलिव्हेटची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ११ लाख असण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे