श्रीहरीकोटा, ३० जुलै २०२३ : भारतासाठी आणखी एक मोठे यश, आज म्हणजेच ३० जुलै, रविवारी, आज सकाळी ६:३० वाजता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून सिंगापूरचे ७ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. हे प्रक्षेपण ४४.४ मीटर लांबीच्या पीएसएलव्ही- सी५६ रॉकेटने करण्यात आले आहे. पीएसएलव्ही चे हे ५८ वे उड्डाण आहे. तेथे पाठवण्यात आलेल्या सात उपग्रहांपैकी हा सर्वात महत्त्वाचा DS-SAR उपग्रह असल्याचे मानले जाते.
पुन्हा एकदा भारताने अवकाशात नवा विक्रम केला आहे. आज इस्रोने श्रीहरिकोटा येथून पीएसएलव्ही-सी५६ रॉकेट प्रक्षेपित केले आहे. इस्रोने या रॉकेटद्वारे ७ उपग्रह अवकाशात पाठवले आहेत. सिंगापूरचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि इतर ६ उपग्रह पीएसएलव्ही रॉकेटच्या माध्यमातून कक्षेत टाकण्यात येणार आहेत.
DS-SAR उपग्रह सिंगापूरच्या संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान एजन्सी (DSTA) आणि सिंगापूरच्या स्वतःच्या ST अभियांत्रिकी यांच्यातील महत्त्वपूर्ण भागीदारी अंतर्गत विकसित करण्यात आला आहे. त्याचबरोबर सिंगापूर सरकारच्या विविध एजन्सींना प्राप्त झालेल्या उपग्रह प्रतिमांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीही या उपग्रहाचा वापर केला जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड