अलीगड, ७ ऑगस्ट २०२३ : अयोध्येत साकारात असलेल्या राम मंदिरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील वर्षी जानेवारीमध्ये भाविकांसाठी मंदिर खुले होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अलिगड येथील रामभक्त आणि प्रसिद्ध कुलूप निर्माते सत्यप्रकाश शर्मा यांनी सर्वात मोठे हस्तनिर्मित कुलूप या मंदिरासाठी तयार केले आहे. त्यांचे वजन ४०० किलो आहे. कुलूप बनवण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत केली आहे. हे भव्य कुलूप या वर्षाच्या अखेरीस राम मंदिराच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येणार आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिरासाठी मोठ्या संख्येने भक्तांकडून भेटस्वरुपात अनेक वस्तू दिल्या जात आहेत. शर्मा यांनी तयार केलेल्या कुलूपाचा उपयोग कुठे करता येईल, हे नंतर सर्वानुमते ठरवण्यात येणार आहे. शर्मा यांचे कुटुंबीय एक दशकांहून अधिक काळापासून हस्तनिर्मित कुलूप बनवत आहेत. ते स्वतः ४५ वर्षांपासून या व्यवसायात आहेत.
सत्यप्रकाश शर्मा यांनी सांगितले की, हे कुलूप तयार करण्यासाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च आला आहे. त्यासाठी मी स्वेच्छेने पैसे साठवले. अनेक दक्षकांपासून कुलूप बनवण्याचा व्यवसाय करत असल्याने राममंदिरासाठी मोठे कुलूप तयार करण्याचा विचार केला. आमचे शहर कुलूपांसाठी ओळखले जाते. विशेष म्हणजे एवढे भव्य कुलूप यापूर्वी कोणीही तयार केले नव्हते.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर