पुणे, १६ ऑगस्ट २०२३ : नेपाळ क्रिकेट बोर्डाने देखील ACC ODI एशिया कप, २०२३ साठी आपला संघ जाहीर केला आहे. १७ खेळाडूंच्या या संघाचे नेतृत्व २० वर्षीय तरुण रोहित पौडेल करणार आहे. आशिया चषक २०२३ ची सुरुवात ३० ऑगस्ट रोजी पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामन्याने होईल आणि या हंगामातील अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये खेळला जाईल.
पाकिस्तान ACC ODI एशिया कप, २०२३ चे आयोजन करत आहे. या स्पर्धेतील काही सामने पाकिस्तानात तर काही श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामना मुलतान येथे होणार आहे. दोन गटात खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत एकूण ६ देश रिंगणात असतील.
भारत आणि पाकिस्तानसह नेपाळ अ गटात आहे. या स्पर्धेसाठी नेपाळच्या संघात खेळाडू श्याम ढकल, संदीप जोरा यांचीही नावे आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार ज्ञानेंद्र मल्ला याने निवृत्तीची घोषणा केली होती.
अ गट: पाकिस्तान, भारत, नेपाळ.
ब गट: बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका.
आशिया कपसाठी नेपाळ संघ: रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुरटेल, आसिफ शेख (यष्टीरक्षक), भीम शार्की, कुशल मल्ला, आरिफ शेख, दीपेंद्र सिंग आयरी, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी, अपेक्षा जीसी, श्याम ढकल, संदीप जोरा, किशोर महतो आणि अर्जुन सौद.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड