ICC वर्ल्ड कप सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, भारताचा सामना इंग्लंड आणि नेदरलँडशी

नवी दिल्ली, २४ ऑगस्ट २०२३ : आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ ५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २९ सप्टेंबरपासून सराव सामने सुरू होतील. पहिला सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात गुवाहाटी येथे होणार आहे. भारताचा पहिला सामना ३० सप्टेंबर रोजी इंग्लंडविरुद्ध आणि दुसरा सामना ३ ऑक्टोबर रोजी नेदरलँडशी होणार आहे.

गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि हैदराबाद या तीन ठिकाणी सामने होतील. ५ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय विश्वचषक सलामीच्या सामन्यापूर्वी सर्व १० संघांचे अधिकृत सराव सामने होणार आहेत. सर्व १० संघ ५ ऑक्टोबर रोजी विश्वचषक सुरू होण्याच्या पूर्वार्धात भारतातील तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये, प्रत्येकी दोन अधिकृत ५० षटकांचे सामने खेळतील, असे आयसीसीने म्हटले आहे.

हे सामने शुक्रवार २९ सप्टेंबर ते मंगळवार ३ ऑक्टोबर या कालावधीत गुवाहाटी, हैदराबाद आणि तिरुअनंतपुरम येथे खेळले जातील आणि विश्वचषकादरम्यान संघांना परिस्थितीशी जुळवून घेण्याची योग्य संधी मिळेल, आणि प्रत्येक संघ सामन्यात सर्व १५ खेळाडूंना मैदानात उतरवण्याची परवानगी आहे.

सराव सामन्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे

२९ सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध श्रीलंका (गुवाहाटी), दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान, (तिरुवनंतपुरम) आणि न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (हैदराबाद).

३० सप्टेंबर: भारत विरुद्ध इंग्लंड (गुवाहाटी), ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स (तिरुवनंतपुरम).

२ ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध बांगलादेश (गुवाहाटी), न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (तिरुवनंतपुरम).

३ ऑक्टोबर: भारत विरुद्ध नेदरलँड्स (तिरुवनंतपुरम), अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका (गुवाहाटी), पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (हैदराबाद).

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा