नवी दिल्ली, २७ ऑगस्ट २०२३ : भारत आघाडीची पुढील आणि तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. ही बैठक दोन दिवसांची आहे. यात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांच्यासह आघाडीच्या सर्व २६ पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन या बैठकी विषयी म्हणाले की, इंडिया आघाडीची पुढील बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार असून त्यात काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले जाणार आहेत. मीही त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे.
या बैठकीत पुढील अजेंड्यावर चर्चा होणार आहे. तसेच युतीचा लोगोही जारी करता येईल. ३१ ऑगस्टला संध्याकाळी अनौपचारिक आणि १ सप्टेंबरला औपचारिक बैठक होणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी शनिवारी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड